About Us

सरकारी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असून त्या आपल्या पर्यंत पोहचू शकत नाहीत. अर्ज कसे भरावे ? कुठे भरावे ? तसेच त्या बद्दल लागणारी सर्व माहिती आपल्या कडे असेलच असे नाही. त्या साठी आपल्याला आपल्या "मराठी" भाषेत इच्छित नोकरीचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

आजकाल सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरु असते. या नोकर भरतीमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात किंवा छापील अर्ज पोस्टाने पाठवून द्यावे लागतात.

संगणक युगात विद्यार्थ्यांनी नौकरी/स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा आणि नोकरीच्या संधी हातून जावू नये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवून स्पर्धकाला त्याच्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग साधता यावा म्हणून या वेबसाईट ची आम्ही निर्मिती करत आहोत. काही इंटरनेट कॅफे अथवा कॉम्पुटर क्लास मधून ऑनलाईन अर्ज भरून दिले जातात. परंतु, चालकास उपलब्ध सर्वच नोकरभरतीची माहिती असतेच असे नाही. त्यामुळे या संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाही याशिवाय छापील अर्ज हे प्रामुख्याने शहरातील निवडक पेपर विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. बरेचदा या मुद्रित अर्जाचा दर्जा संबधित संस्थेस अपेक्षित गुणवत्तेचा असत नाही. तरीही त्याला पर्याय उपलब्ध नसल्याने अनेक नोकरी इच्छुक उमेदवार तो खरेदी करतात.

संभाव्य नोकरी शोधण्यासाठी आपण या वेबसाईट चा वापर करू शकता, या वेबसाईट चा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी अशा आहे.